पाचोरा माध्यमिक विद्यालय येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा
पिंप्री (सार्वे )ता.पाचोरा माध्यमिक विद्यालय येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प.शाळा नांदगाव तांडा चे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मुलांमध्ये व्यवसाय कौशल्य विकसित व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. मुलांनी जवळपास 32 स्टॉलची उभारणे केली होती. यामध्ये पाणीपुरी, पावभाजी, सँडविच, शेवपुरी, गुलाबजाम,बर्फी, पॉप कॉन,विविध प्रकारचे लाडू,पाव वडा,भेळ, मॅजिक खेळ, खमंग इ. या सर्व पदार्थांचा शिक्षक व विद्यार्थी,गावकरी यांनी मनमुराद आस्वाद घेतला. शेवटी एकही पदार्थ शिल्लक राहिला नाही. यामध्ये जवळपास 7ते 8 हजार रुपयांपर्यंत उलाढाल झाली. सर्व स्टॉल अतिशय रंगबे रंगी पद्धतीने सजवले होते. या कार्यक्रमास आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सागर पाटील सर जि प शाळा पिंप्री सार्वे शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आर.इ.पाटील सर यांनी केले. अनुमोदन श्री. गुलाब पाटील सर यांनी दिले.कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती जयश्री पाटील मॅडम व सौ नम्रता पाटील मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. एकंदरीत कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.
Comments
Post a Comment